आमच्या बद्दल

वाढती लोकसंख्या, औदयोगिकरणामुळे कृषिक्षेत्रातून कामगारांचे औदयोगिक केंद्रांकडे स्थलांतर, शहरांची वाढ व बदलते कौटुंबिक जीवन, या सर्व कारणांमुळे मानवी जीवनमानाविषयीच्या कल्पनांमध्ये आमूलाग्र  बदल घडून आला. वैज्ञानिक व वैदयकीय क्षेत्रांतील लक्षणीय प्रगतीमुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. उत्पादन वाढले, उदयोगधंदे विस्तारले, आरोग्यविषयक सुविधा व रोगप्रतिबंधक उपाय उपलब्ध झाले; मात्र या प्रगतीचा समाजातील सर्व स्तरांना समान फायदा झाला नाही. वास्तवात, सर्वसामान्य जनतेला, विशेषत: कामगार वर्गाला यथार्थ साधनसामग्री, योग्य वेतन, अन्नपुरवठा, निवारा, शिक्षण व सुरक्षा या सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे समाजातील कामगार वर्ग हा शोषितचं राहिला कंपन्या मोठ्याझाला आणि कामगार गरीबच राहिला, उद्योजकाचा मुलगा बाहेरगावी जाऊन शिक्षण घेऊ लागला आणि आपल्या कामगाराच्या  मुलाला साधं शिक्षण पूर्ण नाही करता आलं, कारण बहिणीचं लग्न आहे वडील कुठे कुठे खर्च करणार, परत तो कामगाराचं राहिला, हाच तोच कामगार ज्याने भारताला आर्थिक दृष्ट्या प्रबळ केलं, परंतु स्वतःला स्वतःच्या  घराला प्रबळ करू शकला नाही, त्याचं एका कामगाराचा मुलगा आहे मी. आज आपण इथे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कामगार वर्गाला सर्व सुख सुविधा तसेच शासनामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजना किमान वेतन, PF, ESIC, Graduty, Leaves, Bonus, महिलांना समान काम का समान वेतन, महिलांना प्रसूती वेतन अशा अनेक योजनांचा लाभ मिळवून देणे. तसेच मालकाकडून होणाऱ्या पिळवणूकीच्या विरोधात कामगारांची मदत करू  व त्यांना न्याय मिळवून देवू